आजपासून राज्यातील अनेक भागांत रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून येत्या तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला गेला आहे. तसेच काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. पहा कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट जारी
हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र ओडिशाच्या दिशेने पुढे सरकत आहे.
त्यामुळे पुढील काही दिवस गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर ठाणे, नाशिक, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर हे जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.


