जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन– रेल्वस्थानकावर दि. 13/09 /23 चे 08.40 वाजे पूर्वी रेल्वे स्टेशन जळगाव प्लॅटफॉर्म नंबर 06 कि.मी.419/1015 N जवळ एक अनोळखी पुरूष बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने ऑन ड्युटी स्टेशन मास्टर रेल्वे स्टेशन जळगाव यांचा लेखी मेमो वरून सदर इसमास औषदोपाचार कामी सिव्हिल हॉस्पिटल जळगाव येथे नेले असता तेथील ऑन ड्युटी डॉक्टरांनी त्यास तपासून मयत गोषित केले आहे तरी सदर मयत यांची ओळख पटली नसून व त्यांचे प्रेत ओळख पटवणे कामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे राखून ठेवले आहे करिता नागरिकांना ओळख पटवण्याचे आवाहन रेल्वे पोलीस जळगाव यांचे मार्फतीने करण्यात येत आहे. मयताचे वर्णन :डोळे बंद, केस पांढरे, दाढी पांढऱ्या रंगाची साधारण वाळलेली, रंगाने सावळा, शरीर बांधा सडपातळ, उंची 05 बाय 5, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट त्यावर ग्रे रंगाची डिझाईन, नेसणीस निळ्या रंगाचा अंडरवेअर.अनोळखी मयत पुरुष वय अंदाजे 50 ते 55 वर्ष हे दिनांक पुढील घटनेचा तपास पो.ना नरेंद्र चौधरी करीत आहे.


