• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जी.प अभियंता ४ लाखांची लाच घेतांना रंगेहाथ अटक

policevrutta by policevrutta
September 17, 2023
in क्राईम, चाळीसगांव, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जी.प अभियंता ४ लाखांची लाच घेतांना रंगेहाथ अटक
0
SHARES
691
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


चाळीसगाव: पोलीस वृत्त ऑनलाइन क्लस्टरची रक्कम काढून देण्यासह अतिरिक्त अनामत रक्कम परत मिळवून देण्यासाठी चार लाख रूपयांची लाच स्वीकारतांना जिल्हा परिषदेच्या उप अभियंत्याला रंगेहात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.


अधिक माहिती अशी की तक्रारदार यांनी डॉ . शामा प्रसाद मुखर्जी रुरबन’ ( shama Prasad mukharji)या शासकीय योजनेचा माध्यमातून, बांधकाम उप विभाग ,ता.चाळीसगाव जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पातोंडा ता.चाळीसगाव येथे समूह परिसरात क्लस्टर विकसित करण्याचे काम घेतले होते. या कामाची ४ कोटी ८२ लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात तसेच कामाचे अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम ३५ लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता ज्ञानेश्‍वर पंढरीनाथ विसपुते ( वय ५७, रा. अशोक नगर, धुळे ) यांनी तक्रारदाराला पाच लाख रूपयांची मागणी केली होती.

दरम्यान, संबंधीत कंत्राटदाराने या संदर्भात नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. या अनुषंगाने नाशिक एसीबीच्या पथकाने सापळा रचून ज्ञानेश्‍वर पंढरीनाथ विसपुते यांना चार लाख रूपयांची लाच स्वीकारतांना रंगे हाथ अटक केली. यामुळे एकच खळबळ उडाली असून जि.प. बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.

सदर कारवाई एसीबी नाशिकच्या अधिक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक स्वप्नील राजपूत यांच्या नेतृत्वाखालील प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, किरण धुळे, अविनाश पवार आणि सुरेश चव्हाण या कर्मचार्‍यांच्या पथकाने केली. या संदर्भात चाळीसगावात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

मोठी बातमी ! – राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार – हवामान विभागाकडून २४ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Next Post

झोपलेला मुलाला उठवायला गेले वडील अन् मुलाची भयानक अवस्था पाहून….थेट बसला धक्का जळगावातील घटना….

policevrutta

policevrutta

Next Post
झोपलेला मुलाला उठवायला गेले वडील अन् मुलाची भयानक अवस्था पाहून….थेट बसला धक्का जळगावातील घटना….

झोपलेला मुलाला उठवायला गेले वडील अन् मुलाची भयानक अवस्था पाहून....थेट बसला धक्का जळगावातील घटना....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!