छत्रपती संभाजीनगर : रक्षाबंधनाच्या दिवशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भावाने बहिणीच्या घरी टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. उद्योग नगरी वाळूज परिसरातील बजाजनगरातील छत्रपती नगरमध्ये बहिणीच्या घरी राहत असलेल्या 30 वर्षीय भावाने गळफास घेऊन आपले जीवन संपवलं आहे.ऐन रक्षाबंधनाच्याच दिवशी भावाने फाशी घेतल्याचे दिसताच बहिणीने एकच आक्रोश केला.आकाश सर्जेराव शिंदे या 30 वर्षांच्या व्यक्तीने टोकाचा निर्णय घेतला. आकाश हा खैरका गाव, तालुका मुखेड जिल्हा नांदेडचा रहिवासी होता.ताई मला माफ करा, असे लिहून ठेवत त्याने जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह घाटी दवाखान्यात पाठवला. यानंतर डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. आकाशने रक्षाबंधनाच्या दिवशीच गळफास का घेतला, याचा तपास पोलीस करत आहेत


