यंदा देशात मान्सूनवर अल निनोचा प्रभाव दिसून आला. त्यामुळे जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही. यामुळे आता सप्टेंबर महिन्यात कसा पाऊस पडणार ? याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाल्यास रब्बी हंगाम शेतकऱ्यांना घेता येणार आहे. दरम्यान आता हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
कुठं पडणार पाऊस
राज्यातील गडचिरोली, गोंदिया, भंडरा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, नागपूर, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
तसेच मराठवाड्यातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत देखील पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.


