शिंदखेडा: पोलीस वृत्त ऑनलाईन– तालुक्यात ऑगस्ट महिना अखेर पर्यंत अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी यांच्या खरीप हंगामाचे संपूर्ण नुकसान झाले असून तसेच नदी, नाले, धरणे, शेततळे, विहिरी यांच्यात देखील पाणी साठा नसल्या मुळे आपण तात्काळ शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून शिंदखेडा तालुका दुष्काळ घोषित होणे संधर्भात उपाययोजना करून शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी बांधवाना दिलासा देण्या साठी शासन स्थरावरून तात्काळ मदत मिळवून द्यावी. तसेच भविष्यातील येणान्या पानी टंचाई, गुरांन साठी चारा टंचाई संदर्भात उपाययोजना करून संभाव्य पाणी टंचाई ची उपाययोजना करावी असे निवेदन तहसीलदार यांना दिले त्या प्रसंगी संभाजी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुलदादा निकम, कलमाडी गावाचे सरपंच सोनूदादा झालसे, ॲड. निलेशदादा देसले, तालुकाध्यक्ष निखिल पाटील, सचिन पाटील, योगेश पाटील, नितिन सोनवणे, कुंदन जाधव, योगेश सोनवणे व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


