जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन- जिल्ह्यात अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असताना आणखी एका ८ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची जिल्हा हद्रवणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका विरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात ८ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासोबत वास्तव्यास असून याच गावातील एका इसम राहायला आहे. दि.२६ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास संशयित आरोपीने ८ वर्षीय अल्पवयीन मुलीस तंबाखूची पुडी आणून देण्याच्या बहाण्यान्या आपल्या घरी बोलवीत तिच्या सोबत चुकीचे कृत्य केल्याची घटना घडली त्यांनंतर अल्पवयीन मुलीने तिच्या सोबत घडलेला प्रकार आपल्या आजीला सांगितला असता. तिच्या आजीने लागलीच चोपडा शहर पोलिसात धाव घेत एका संशयित आरोपी विरोधात अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहेत. या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसानी बेड्या ठोकल्या आहे.


