अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन– शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे शहरातील तिरंगा चौक परिसरात एका युवकाने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आले आहे

मिळालेली माहिती वरुन अमळनेर शहरातील तिरंगा चौकातील रहिवाशी असलेला प्रदीप चींधु पाटील वय 40 ह्या युवक घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेतलेल्या अवस्थेत उघडकीस आले आहे. वरच्या मजल्यावरून दुर्गंधी आल्याने सदरील घटना उघडकीस आली. गेल्या चार दिवसांपासून गळफास घेउन लटकलेल्या अवस्थेत असल्याचे अंदाज वर्तवल जात आहे. घटनास्थळी पोलीस पोहचले असुन या घटने मागील कुठलेही कारण अद्यापही समजले नसून पुढील तपास पोलीस करीत आहे सुरू आहे.

