जामोद (बुलढाणा) :(पोलीस वृत्त ऑनलाईन) तालुक्यातील हनवतखेड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. सर्पदंशामुळे २२ वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना हनवतखेड येथे ९ ऑगस्ट रोजी दुपारी घडली.
हनवतखेड(hanvatKhed)येथील फुलाबाई सुनील डावर (fulabai Sunil dawar)घरात काम करत असताना विषारी सापाने दंश केला. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेत महिलेच्या गर्भात असलेल्या चार महिन्यांच्या अर्भकाचासुद्धा मृत्यू झाला.