पांढरा पेरू प्रत्येकाने खाल्ला असेल आणि त्याचे फायदे जाणून घेतले असतील. पण लाल पेरू खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घेऊयात लाल
लाल पेरूचे फायदे :लाल पेरू मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. लाल पेरूमध्ये खूप कमी साखर असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.लाल पेरू खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. लाल पेरूमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते.
लाल पेरू खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. लाल पेरू शरीरात ट्यूमर तयार होण्याची प्रक्रिया रोखण्यासाठी उपयुक्त आहे.
लाल पेरूमध्ये पोटॅशियम देखील जास्त प्रमाणात आढळते. त्यामुळे बीपीच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर ठरू शकते.
व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात असते. हे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.