अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन– येथील कायमच्या चर्चेत असणाऱ्या राष्ट्रवादीच्या ताईसो तिलोत्तमा पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त झाली आहे. नाशिक जिल्हा निरीक्षक म्हणून देखील जबाबदारी मिळाली आहे. ताईंची मोठी जबाबदारी वाढल्याने त्यामुळे त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
खानदेशात चर्चेत असणाऱ्या गेल्या ३२ वर्षापासून राजकारणात असलेल्या आणि तालुका ते राज्य पातळीवर विविध पदांचा / कामकाजाचा अनुभव असलेल्या अमळनेर येथील तिलोत्तमा पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते सदर नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी पक्षात पक्षाशी एकनिष्ठ तसेच प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे शिरूड गावची सुनबाई ही गावासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या निवडीने सर्वत्र परिसरात स्वागत केले जात आहे.


