राज्यात धोंड्याचा महिना हा चांगल्या प्रकारे साजरा केला जातो यातील धक्कादायक बातमी समोर आले आहेत. नाशिकमधून घटना धोंड्यासाठी माहेरी आलेल्या मुलाचा तिच्या आई बरोबर विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्ति केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील ओझरमध्ये हा प्रकार घडला आहे. दत्तनगर परिसरातील मुलगी बऱ्याच दिवसांनी आपल्या घरी आली होती. यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील ओझर मध्ये दत्तनगर परिसरात तील मुलगी बऱ्याच दिवसांनी आपल्या आईच्या घरी धोंड्याच्या कार्यक्रमानिमित्त आल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. मुलीच्या आईच्या घरी घराबाहेर एक पेरूचे झाड असल्याने मुलीला पेरू खाण्याची इच्छा झाली ती गच्चीवर जाऊन पेरू तोडताना उच्च दाबाच्या तारांना तिच्या हातातील लोखंडे रोड लागल्याने मुलीला जोरदार विजेचा धक्का बसला त्यामुळे विजेचा प्रवाह गच्चीवरील पाण्याच्या टाकीत उतरल्याने पाण्याची टाकी देखील फुटली व पाण्याचा करंट बसल्याने तिच्या आईचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या ठिकाणी मोठा आवाज झाल्याने घटनास्थळी लागलीच जावयाने धाव घेतली मात्र त्यांना पाण्यातील करणे देखील बाहेर फेकले आणि ते थोडक्यात बचावले घटनेची माहिती मिळताच मुलीचे भाऊ देखील घराकडे आला यावेळी त्याचा देखील अपघात झाला तो गंभीर असून या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेत आकांक्षा रणशूर आणि मीना सोनवणे अशी आई मुलीचे नाव असल्याचेही समजते.


