अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन भरधाव कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट कठडे तोडून पुलाखाली कोसळली आहे ही घटना अमळनेर चोपडा रस्त्यावर अंबाऋषी महाराज टेकडी जवळ रविवारी ६ ऑगस्ट रोजी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
अमळनेर ते चोपडा महामार्गावरील अंबाऋषी महाराज टेकडी जवळ लहान पुल आहे. रविवारी ६ ऑगस्ट रोजी या पुलावरून कार क्रमांक (एमएच ०४ डीडब्ल्यू १३५०) ही जात असतांना अचानक कारवरील चालकाने नियंत्रण सुटल्याने पुलाचे कठडे तोडून पुलाच्या खाली कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. यावेळी अपघातस्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. दरम्यान, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील चौकशीचे काम सुरू आहे.