पारोळ्या: पोलीस वृत्त ऑनलाईन– महिलांवर होणार्या अत्याचारांचा उच्चांक गाठलेला पाहिला. अजाण बालिका, अल्पवयीन मुली, मध्यमवयीन महिला… वासनांध विकृतीला बळी जाण्याकरिता कोणत्याही वयाचा अपवाद नाही. ही विकृती केवळ महिलेच्या, तरुणींच्या शरीराचा उपभेाग घेण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. पुढे जाऊन तिचा जीव घेण्यापर्यंत क्रौर्याने थैमान मांडलं आहे भडगाव तालुक्यातील घटना ताजी असताना पारोळा तालुक्यातील देखील एका १६ वर्षीय मुलीला लव्हशिप कर अन्यथा ठार मारेल अशी धमकी देणार विरोधात पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पारोळा तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेली 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी पारोळा शहरात येत असते दिनांक ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पारोळा शहरातील बस स्थानकाच्या पाठीमागील बोगद्याजवळ रोडवर उंदीर खेडा गावातील बस स्थानक तसेच फिर्यादीच्या घरासमोर वेळोवेळी संशयित आरोपीने सोळा वर्षी अल्पवयीन मुलीस तिचा पाठलाग करीत उजवा हात धरून तू मला आवडतेस तू माझ्यासोबत लवशिप कर असे बोलून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होऊन तू जर माझ्यासोबत लवशिप केली नाही तर मी तुला स्वतःला जीवानिशी ठार करेल अशी धमकी दिली त्यामुळे अल्पवयीन मुलीचे वडिलांनी त्याला समजाविण्यासाठी गेले असता त्यांनी अल्पवयीन मुलीच्या वडिलांना देखील शिवीगाळ करून अश्लील हावभाव करून तू जाने जे होईल ते करून घे अशी धमकी दिली या प्रकरणी अल्पवयीन मुलीने पारोळा पोलीस स्थानकात धाव घेत संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करीत आहे.


