शिरपूर: प्रतिनिधी– तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय श्री. अमरीशभाई पटेल तसेच शिरपूर नगरीचे शिल्पकार आदरणीय श्री. भुपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून असली गाव परिसरात 50 हजार झाडे लावण्यात येत असून श्री. भुपेशभाई पटेल ग्रीन आर्मी यांच्या सौजन्याने आर .सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खर्दे विद्यालयातील इयत्ता 8वी ते 11 वी वर्गातील 170 विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या मार्फत दि.4/8/2023 रोजी700 वृक्षांची लागवड करण्यात आली.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य श्री. पी. व्ही .पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. धायबर सर, श्री अटकाळे सर,श्री बडगुजर सर, राकेश पाटील यांनी परिश्रम घेतले.


