आय फ्लू किंवा डोळ्यांचा संसर्ग म्हणजे काय? डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील? जाणून घेऊयात याबद्दल माहिती.
आय फ्लू म्हणजे काय? आय फ्लू हा डोळ्यांना होणारा संसर्ग आहे. याला कंजंक्टिवायटिस पिंक आय असेही म्हणतात. सामान्य भाषेत याला डोळे येणे असंही म्हणतात.
डोळ्यांचा संसर्ग दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय –
मध :मधात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. त्यामुळे मधाच्या पाण्याने डोळे धुतल्याने डोळ्यातील जळजळ आणि वेदना मधाच्या पाण्याने लवकर दूर होतील.
गुलाबपाणी : गुलाब पाण्यामध्ये अँटीसेप्टिक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. यामुळे संक्रमण करणाऱ्या जंतूंशी लढण्यास मदत होते. यासाठी फक्त गुलाब पाण्याचे 2 थेंब डोळ्यात टाका.
बटाटा : बटाट्यामध्ये कूलिंग इफेक्ट असल्याने डोळ्यांच्या संसर्गामुळे होणारा त्रास कमी होऊ शकतो. यासाठी बटाट्याचे गोल काप 10-15 मिनिटे डोळ्यांवर ठेवा.
तुळशी : तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तुळशीची काही पाने पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी यातील तुळशीची पानं गाळून या पाण्याने डोळे धुवा.
अर्थात डोळ्यांमधील इन्फेक्शन वाढत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे उपाय करावे.*