उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड येथे दरड कोसळल्यामुळे 3 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे डोंगरावरून आलेल्या मोठ्या ढिगाऱ्यात रस्त्यालगतची दोन दुकाने आणि ढाबे वाहून गेले.
दुकानांमध्ये आणि ढाब्यांमध्ये 4 स्थानिक लोक आणि 16 नेपाळी वंशाचे लोक होते. एसडीआरएफकडून शोध मोहीम राबवली जात आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
रुद्रप्रयागमध्ये शुक्रवारी गौरीकुंड धरण पुलियाजवळ मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. ढिगाऱ्याखाली 20 जण दबले गेले होते. यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. (20 people were buried under the debris. 3 of them have) diedतिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 17 जणांना शोध घेण्यासाठी शनिवारी सकाळपासून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 100 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (SDRF) कर्मचारी स्थानिक प्रशासनाच्या पथकासह शोध मोहिमेत गुंतले आहेत. ड्रोनचाही वापर केला जात आहे(are engaged in a search mission. Drones are also being used)
प्रशासनाने केले सावध राहण्याचे आवाहन –
गौरीकुंडजवळ दरड कोसळण्याच्या घटनेनंतर उत्तरकाशीच्या सीमावर्ती जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने सर्व लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (All people are urged to be vigilant.)भूस्खलन होण्याच्या प्रवण भागात सुरक्षित रहदारीची काळजी घ्यावी, पावसात अजिबात बाहेर नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. उत्तरकाशी जिल्हा पोलिसांनीही एक सूचना जारी केली आहे.