अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन– तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे मध्यरात्रीच्या सुमारास एका गावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने पळवून नेण्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमळनेर शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह या गावात राहत असून दिनांक 3 ऑगस्ट रोजी च्या रात्री ती मुलगी जेवण होऊन रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सर्व झोपी गेले त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुली घेणे त्याच्या आईस उठवीत सांगितले की मी बाथरूमला जाऊन येते त्यानंतर मुलगी जी घराच्या बाहेर गेली आहे ती आजवर परत न आल्याने अल्पवयीन मुलीच्या परिवारातील सदस्यांनी घर परिसर त्यासह अमळनेर शहराच्या आजूबाजूच्या परिसरात देखील शोध घेतला असता पण ती मुलगी अद्याप मिळून न आल्याने अंमळनेर शहर पोलीस स्थानकात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव हे करीत आहे.