धरणगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन– राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा फुले, साई बाबा ,यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना चा वतीने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज स्मरका जवळ झालेल्या आंदोलनात शिवसैनिक यांनी भिडे यांचा जाहीर निषेध केला.
अमरावती जिल्ह्यात बडनेरा येथील एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी महात्मा फुले तर साईबाबा देव्हाऱ्यात पूजा ठेवू नका यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्ये केले. हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. सर्वधर्मसमभाव ही आपल्या देशाची ओळख असून ती पुसण्यासाठी काही लोक प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी निषेध व्यक्त केला तसेच युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी यांनी
भिडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले, राजाराम मोहन रॉय, साईबाबा यांच्यावर टिका करीत असतांना शिव्या आणि जातीय तेढ निर्माण करणारे विधान केल्याने पुन्हा एकदा त्यांच्यावर राज्यातील जनतेतून संताप व्यक्त होवू लागली आहे. भिडे आपल्या भाषणात म्हणाले की, भारतीयांनी राज्य कसे मिळवायचे हे शिकविण्यासाठी इंग्रजांनी देशात सुधारक नावाची जात पैका केली असून काही निवडक लोकांना समाजसुधारकांचा दर्जा दिला आहे. तर उत्तर प्रदेशात भारतप्रसाद मिश्रा, राजा राममोहन रॉय, रामास्वामी नायकर व महात्मा फुले याचा उल्लेख देखील त्यांनी केला. या सर्वांवर देशद्रोहाचे शिक्के असून माझ्याकडे याचे सर्व पुरावे उपलब्ध असल्याचा देखील दावा त्यांनी यावेळी केला आहे. तर हिंदूनी आपल्या घरातील देव्हाऱ्यातून साईबाबाला काढून फेका लक्षात ठेवा मी काय बोलतोय मी काही सटकलेला माणूस नाही, मी जे बोलतोय ते जबाबदारीने बोलते असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. अश्या या देशद्रोही वर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निलेश चौधरी यांनी मत व्यक्त केले
व सह्ययक पोलीस निरीक्षक जितू पाटील यांना निवेदन देण्यात आले
त्याप्रसंगी शिवसेनेचे
जळगाव लोकसभा सह संपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ लोकनियुक्त नगराध्यक्ष युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जानकीराम भाऊ सोनवणे माजी पंचायत समिती सदस्य दीपक भाऊ सोनवणे मा उपनगराध्यक्ष देविदास महाजन जिल्हा संघटक राजेंद्रजी ठाकरे मा नगरसेवक प्रकाश दादा पाटील उपजिल्हाप्रमुख शरद माळीसर तालुकाप्रमुख जयदीप बापू पाटील व तालुकाप्रमुख नंदू भाऊ पाटील शहर प्रमुख भागवत आप्पा चौधरी मा नगरसेवक पाडू महाराज, मा नगरसेवक उमेश महाजन नगरसेवक किरण भाऊसाहेब पाटील नगरसेवक जितेंद्रभाऊ धनगर भरत महाजन पप्पू कंखरे परमेश्वर महाजन महेश चौधरी भीमा भाऊ धनगर गजानन महाजन हेमंत महाजन वासुदेव महाजन संजय धामोळे फिरोज खान साजिद कुरेशी वसीम कुरेशी सय्यद भाई करीम लाला नाना ठाकरे भगवान महाजन सुनील भाऊ चव्हाण विलास भाऊ पवार सतीश बोरसे सुदर्शन भागवत किरण अग्निहोत्री राहुल रोकडे रणजीतसिंग शिकरवार दिनेश भाऊ येवले सुभाष महाजन पंकज महाजन नागराज भाऊ पाटील रमेश महाजन गजानन महाजन अमोल चौधरी पिंटू भाऊ महाजन जगदीश मराठे गोपाल पाटील गणेश महाजन विनोद रोकडे राहुल चव्हाण प्रल्हाद भाऊ पारधी निंबा पाटील रवी महाजन शरद शिरसाट संतोष सोनवणे गोपाल चौधरी सुका भाऊ चौधरी अरविंद चौधरी तसेच शिवसेना युवा सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते


