ठाणे: पोलीस वृत्त ऑनलाईन– समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळली. त्यामुळे 15 ते 20 जणांचा मृत्यू झाला आहे. चार ते पाच जण जखमी आहेत.
शहापूर तालुक्यातील सरलांबे गावाजवळ समृध्दी महामार्गावर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडला. सरळआंबा जवळील समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. यावेळी तयार झालेले सिमेंटचे पुलाचे भाग उचलणारे ग्रेडर मशीन कोसळले. त्याखाली अनेक कामगार दाबले गेले आहेत. यातील १५ जणांचा मृत्यू झाला(Many workers have been suppressed. 15 of them died) असून तीन जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.


