राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आता एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत वाढवली आहे.
तुम्हाला माहिती असेल, आज पीक विमा भरण्याची अंतिम तारीख होती. मात्र आता शेतकऱ्यांना 3 ऑगस्टपर्यंत पिक विमा भरता येणार आहे. तांत्रिक कारणांमुळे कोणत्याही शेतकऱ्याचा पीक विमा भरायचा राहू नये यासाठी 3 दिवसांची मुदत वाढवण्यात आली आहे, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे.


