गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अशातच आता येत्या काही दिवसात सततच्या पडणाऱ्या पावसापासून नागरीकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील दोन दिवस कोकण घाटमाथा, विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय ऑगस्ट महिन्याचे पहिले दहा दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

