जळगाव : पोलीस वृत्त ऑनलाईन- २८ जुलै २०२३ । राज्यातील एसटी बसला होणारे अपघात वाढत असल्याचे दिसून येत असून यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाले आहे. यातच बसचे टायर फुटल्याने बस थेट बाजूलाच असलेल्या शेताच्या बांधावर जाऊन धडकली घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा-काकोडा गावाजवळ आज शुक्रवारी घडली. या अपघात नऊ प्रवासी जखमी झाले आहेत.(Nine passengers have been injured in this accident.)
मुक्ताईनगर आगाराची एमएच २० बीएल-१७७० या क्रमांकाची बस आज जळगाव येथून निघून काटेलधामकडे येत होती. दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा-काकोडा(Kurha- kakoda) गावाजवळ असलेल्या पारंबी फाट्याजवळ बसचे टायर अचानक फुटले. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस ही बाजूलाच असलेल्या शेताच्या बांधावर जाऊन धडकली. या अपघातात बसमधील ९ प्रवाशी जखमी झाले असून त्यांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.सुदैवाने या अपघातात प्राणहानी टळली आहे.No loss of life has been avoided in the accident.

बसमधील जखमींचे नाव :
सुनील झांबरे ( २२, रा. आळंद ); समाधान उखर्डु तायडे ( ६९, रा. मानेगाव ); कमल गोविंदा पवार ( ५९, रा. वढोदा ); जानकोर त्र्यंबक महाले ( ७५, रा. वढोदा); नलीनी भास्कर न्हावी ( ७०, रा. वढोदा); अनुराधा पाटील ( ३५, मेळसांगवे); कस्तुराबाई भोलणकर ( ७०, रा. शिरसोली); सपना विनोद पाटील ( २७, रा. जामनेर); सार्थक विनोद पाटील (२, रा. जामनेर) यांचा समावेश आहे.

