एरंडोल: पोलीस वृत्त ऑनलाईन- तालुक्यातील खळबळजनक घटना समोर आली आहे एका गावातल्या वसतीगृहातील पाच बालिकांवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे याबाबत तिन तीन जणांनाविरोधात एरंडोल तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील एका गावात मुलींचे वसतीगृह असून येथे वास्तव्यास असणार्या पाच बालिकांवर अत्याचार करण्यात आला आहे. यात अनैसर्गिक अत्याचार देखील करण्यात आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे वसतीगृहाचा केअरटेकर म्हणून काम करणार्या इसमानेच हे घृणास्पद कृत्य केले असून त्याला हॉस्टेलची अधिक्षका आणि सचिवाने सहकार्य केल्याचे निष्पन्न झाले असून या तिघांच्या विरोधेत एरंडोल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
यात गणेश शिवाजी पंडित(Ganesh shivaji pandit) हा हॉस्टेलचा केअरटेकर म्हणून कार्यरत असून त्याने वसतीगृहातील पाच अल्पवयीन मुलींचे शोषण केले. ऑगस्ट २०२२ ते जून २०२३ म्हणजे तब्बल दहा महिन्यांपर्यंत त्याने अनेकदा शोषण केले. यात त्याने अनैसर्गिक कृत्य देखील केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या पिडीत मुलींनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यासह हॉस्टेलच्या अधिक्षका म्हणून कार्यरत असलेला हे कृत्य करत असतांना संस्थेच्या अधिक्षका आणि सचिवांना माहिती देऊन देखील त्यांनी काहीही कार्यवाही न करता गणेश पंडितला सहकार्यच केले. यामुळे त्याच्यासह आरोपीचीच पत्नी असलेल्या अरूणा गणेश पंडित आणि संस्थेचा सचिव भिवाजी दीपचंद पाटील या तिघांच्या विरोधात एरंडोल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भादंवि कलम ३५४, ३७६ (२); ३७७; पोक्सो कायद्यातील कलम ३,४,५,६,८,९,१०,१२,१९,२१; आणि ऍट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


