जळगाव : पोलीस वृत्त ऑनलाईन – जळगाव जिल्हा उप कारागृहातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे कारागृहातील बॅरेकमधे बंदीवान असलेल्या तरुणासोबत दुस-या बंदीवान तरुणाने अनैसर्गिक कृत्य (Unnatural act by another detainee youth with youth) केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार बघून इतर इतर बंदीवान साथीदारांनी देखील हा प्रकार करण्याची पिडीत तरुणाकडे मागणी केली.

मात्र या गैर प्रकाराला पिडीत बंदीवान तरुणाने नकार दिला असता त्याला गळ्याच्या डाव्या भागावर लोखंडी पट्टीने मारहाण करुन जीवे ठार करण्याची धमकी देण्यात आली.
जळगाव जिल्हा उप कारागृहात 26 वर्ष वयाच्या बंदीवान तरुणासोबत 12 जुलै च्या अपरात्री अडीच ते चार वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. भयभीत पिडीत तरुणाने या प्रकाराची 25 जुलै रोजी तक्रार दाखल केली आहे. भावेश कांतीलाल दंडगव्हाळ, विकी शिंदे, कलीम शेख सलीम, विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण आदींविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गु.र.न. 282/23 भा.द.वि. 377,324, 506, 34 नुसार गुन्हा दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षकउल्हास च-हाटे करत आहेत.

