यंदाच्या गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवायला कोणतीही बंदी नाही, मात्र या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करावं, असं आवाहन दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत केलं.
यासाठी कृत्रिम तलावांची पुरेशी सोय प्रशासनामार्फत करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर सरसकट बंदी घालू नये, यामुळे मूर्ती तयार करण्याच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांना फटका बसत आहे, अशी मागणी शेकापचे जयंत पाटील यांनी केली होती.


