अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन– शिरुड परिसरात या हंगामात लागवड केलेल्या बीटी कपाशीच्या क्षेत्रात यंदा सुरुवातीपासूनच कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. शेकडो एकरांत कपाशीचे पीक लालसर होत असून वाढ खुंटल्याच्या घटना समोर येत आहेत.
जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड झालेल्या बीटी कपाशीची उगवण झाली. मात्र, आता या झाडांवरील पाने लालसर होऊन वाढ खुंटली आहे. असा प्रकार शिरूड परिसरात समोर आला.
या प्रकारामुळे शेतकरी संभ्रमात पडले आहेत. कपाशीचे झाड नेमके कशामुळे लालसर पडत आहे व वाढ खुंटली याचे निश्चित कारण स्पष्ट नाही. कपाशीवर लाल्या विकृतीची समस्या उद्भवल्याने पिकात शेळ्या, मेंढ्यांना चारण्याची वेळ आली आहे
तहसीलदार यांनी पाहणी करत पंचनामा करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी शेतकरी वर्ग करणार आहे. तसेच या समस्येमागे बियाणे कंपनी, विक्रेते असल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी.