अमळनेर : अमळनेर शहरातील एक धक्कादायक घटना समोर आले आहे. चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याने अत्याचार केल्याची संतापजनक घटना शहरातील एका भागात घडली. याप्रकरणी बुधवारी अमळनेर पोलिसात नराधम पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दिड वर्षांपासून बालिकेवर अत्याचार
१४ वर्षीय पीडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुमारे दिड वर्षापासून आई-वडील यांच्यात भांडण होत होते. भांडण झाल्यावर आई बाहेरगावी निघून जात असे त्यामुळे वडिलांसोबत घरीच राहून पीडीता शाळेत जात असायची परंतू नराधम पित्याने रात्री घरी आल्यावर लैंगिक शोषण करायचा. पीडीतेने विरोध केल्यावर तुला आणि तुझ्या आईला मारेन, अशी धमकी दिली. वेळोवेळी आई बाहेरगावी गेल्यावर रात्रीच्या वेळेस नेहमीच नराधम पित्याने संबंध ठेवले तर
भीतीने या प्रकाराबाबात पीडीतेने कुणालाही सांगितले नाही. 21 एप्रिल पासून वडिलांसोबत भांडण झाल्यापासून पीडीतेची आई भाहेर निघून गेली होती. 15 तारखेला वडिलांनी केलेला अत्याचारनंतर दीड वर्षापासून सुरू असलेला छळ असह्य झाला. मंगळवार, 18 रोजी आई आजीसह घरी परत आल्यावर बुधवार, 19 रोजी रोजी रात्रीच्या वेळेस आई व आजी यांना या घटनेबाबत पिडीतेने सविस्तर सांगीतले. त्यानंतर गुरुवार, 20 रोजी पीडीतेने आईसोबत पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तात्काळ नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तपासह सहाय्यक निरीक्षक हरीदास बोचरे करीत आहेत.


