जळगाव: पोलीस वृत्त-ऑनलाईन: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवसेना जळगाव ग्रामीण या फेसबुक पेजवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची बदनामी केल्याप्रकरणी नगरसेवक गणेश सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिवसेना जळगाव ग्रामीण या फेसबुक पेजवर 7 एप्रिल ते 25 जुलैपर्यंत वेळोवेळी पालकमंत्री पाटील यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर टाकण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम 499 व 500 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय पोटे हे करीत आहेत.


