‘प्रगती आढावा अहवाल 2023’ प्रसिद्ध झाला असून या अहवालानुसार वर्ष 2015-16 ते 2019-21 या पाच वर्षांच्या काळात साडेतेरा कोटी भारतीय बहुआयामी गरिबीतून मुक्त झाले आहेत.
ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील गरिबीचे प्रमाण कमी
या अहवालानुसार, 24.85 टक्के बहुआयामी गरिब व्यक्तींच्या संख्येत 9.89 टक्क्यांची लक्षणीय घसरण नोंदवत वर्ष 2019-21 मध्ये ती 14.96 टक्के झाली आहे. या काळात देशातील ग्रामीण भागातील गरिबी सर्वात जलद गतीने 32.59 टक्क्यांवरुन कमी होऊन 19.28 टक्के झाली आहे. तर शहरी भागातील गरिबीचे प्रमाण 8.65 टक्क्यांवरुन 5.27 टक्के इतके झाले आहे. एकंदरीत, पोषण, शालेय शिक्षणाचा कालावधी, स्वच्छता तसेच स्वयंपाकाचा गॅस यामध्ये झालेल्या सुधारणांनी गरिबी कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे अहवालात म्हटलं आहे.