जळगाव पोलीस वृत्त ऑनलाईन: भुसावळ शहरातील एका दाखल असलेल्या प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी पाच लाखांची लाच मागून तडजोडीअंती तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह रायटर तुषार पाटील व खाजगी पंटर ऋषी दुर्गादास शुक्ला यांना धुळे एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केली. एसीबीच्या या कारवाईने जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा खाकीला डागाळली आहे.
काही दिवसांपूर्वी बायोडिझेलची वाहतूक करणारा टँकर बाजारपेठ पोलिसांकडे कारवाईसाठी दिला होता मात्र गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात 15 लाखांची मागणी करण्यात आलीव सुरूवातीला तीन लाख रुपये घेवून नंतर पुन्हा 12 लाख रुपये मागण्यात आल्याने तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. ऋषी शुक्ला व तुषार पाटील यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली तर पोलीस निरीक्षकांसाठी लाच मागण्यात आल्याने त्यांना देखील अटक करण्यात आली.
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागावाचे(Dhule Anti-Corruption Division) पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील, पो. हवा राजन कदम, पो कॉ. संतोष पावरा, पो.कॉ.रामदास बारेला, पो. हवा चालक सुधीर मोरे यांनी कारवाई केली