आजकाल बहुतांश लोकांना पोटावरची चरबी वाढण्याची समस्या जाणवू लागली आहे. अगदी कमी कालावधीमध्ये पोट वाढल्यासारखं वाटत. पण असं का होत?
पोटाची चरबी ‘का’ वाढते?
अयोग्य आहार, अनियमीत व्यायाम तसेच संपूर्ण दिवस एकाच ठिकाणी बसून राहिल्याने पोटाची चरबी वाढते. दारूच्या अतिसेवनामुळे पोटाची चरबी देखील वाढू लागते. दारूमध्ये कॅलरीज जास्त असतात, ज्यामुळे तुमची भूक वाढू शकते आणि परिणामी शरीरातील चरबी वाढते.
झोप कमी झाल्यामुळे किंवा झोपेच्या कमतरतेमुळे वजन वाढण्याची समस्या जाणवू शकते. यासोबतच ताणतणावामुळे वजन वाढू शकते. साखर खाल्ल्याने पोटाची चरबी सर्वात जास्त वाढते. मिठाई, गोड पदार्थ किंवा साखरेचा चहा प्यायल्याने तुमच्या पोटाची चरबी वाढतच जाते. एकंदरीत, आपल्या जीवमानातील बदल, खाण्यापिण्याच्या बदलेल्या सवयी आणि व्यायामाचा आभाव या सर्वच गोष्टींमुळे वजन वाढू शकते.