जळगाव- पोलीस वृत्त ऑनलाईन: रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर एका माथेफिरु अनोळखी इसमाने थांबलेल्या रेल्वे मालवाहू रेल्वे गाडीवर उभे राहून विद्युत शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
रेल्वे पोलीस कर्मचारी सचिनकुमार भावसार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार १४ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ जवळ एका उभ्या असलेल्या मालवाहू रेल्वेच्या डब्यावर उभा राहिल्याने एका अनोळखी अंदाजे ५० वर्षीय व्यक्तीचा रेल्वेच्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
ही घटना घडल्यानंतर रेल्वे पोलीस ठाण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अतिफ शहा यांनी तपासणी यांची मयत घोषित केले. रेल्वे पोलीस कर्मचार्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मयताचे वर्णन :- केस नाही रंगाने सावळा शरीर बांधा सडपातळ ,उंची 05 बाय,अंगात गर्द नारंगी रंगाचे फुल बाहीचे शर्ट व कातड्या रंगाची चेक्स फुल पॅन्ट फिकट काथळ्या रंगाचे अंडर पॅन्ट, उजव्या हातावर उजव्या हातावर सुरेश असे गोंदलेले, मयत पुरुष वय 55 व मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले असून नजीकच्या जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. या घटनेबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस कर्मचारी पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन कुमार भावसार हे करीत आहे