पावसाळ्यात दमट वातावरण आणि ओलसरपणामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. हे बुरशीजन्य आजार टाळण्यासाठी आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे?
अशी घ्या स्वतःची काळजी :
सुती कपडे वापरा : सुती किंवा इतर सैल आरामदायक कपडे वापरा. यामुळे त्वचेला श्वास घेण्यास जागा मिळेल, तसेच हवा शरीरात जाईल आणि शरीर ओलसर राहणार नाही.
वैयक्तिक स्वच्छता राखा :पावसाळ्यात बाहेरून आल्यावर हात आणि पाय साबणाने स्वच्छ धुवा. तुमची नखे लहान आणि स्वच्छ ठेवा, यामुळे तुम्हाला संसर्ग टाळता येईल.
त्वचा कोरडी ठेवा : पावसात भिजल्यानंतर स्वतःला पूर्णपणे कोरडं करा, शक्य असल्यास कपडे बदला. ओलावा राहिल्यास बुरशीचा धोका जास्त असतो.
हायड्रेटेड रहा :पुरेसे पाणी प्यायल्याने तुमची त्वचा निरोगी राहते. तसेच योग्य पोषक आहार घ्या. यामुळे तुमचं शरीर फंगल इन्फेक्शन प्रतिरोधक होईल.
अँटीफंगल पावडरचा वापर करा : बुरशीची वाढ रोखण्यासाठी तुम्ही अँटीफंगल पावडर वापरू शकता. विशेषतः ज्या भागात जास्त घाम येतो, तेथे अँटीफंगल वापरणे फायदेशीर ठरेल.