पारोळा: पारोळा तालुक्यातील संतापजनक घटना समोर आली आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी यांनी एका ग्रामसेविकेचा वारंवार छळ करून शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी दि. ८ रोजी पिडीत ग्रामसेविकेच्या फिर्यादीवरून गटविकास अधिकारीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
पारोळा तालुक्यातील एका ग्रामसेविकेकडे दोन गावांचा पदभार असून त्या आपल्या पदावर काम करत असताना दि. १२ डिसेंबर २०२१ पासून रुजू झालेले गटविकास अधिकारी विजय दत्तात्रेय लोंढे (Vijay dattatrey londhe) (वय ४४) रा. जळगाव यांच्याकडून वारंवार छळ केला जात होता. गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेविकेला आपल्या दालनात बोलून चित्र विचित्र प्रकारे हावभाव करत आपल्याजवळ खेचण्याचा प्रयत्न केला. ही बाब ग्रामसेविकेच्या लक्षात आल्यावर तिने गटविकास अधिकारी यांना सांगितले की, मी त्यातली नाही, मी माझ्या पतीला सांगेल. त्यावर गटविकास अधिकारी यांनी तू जर कोणाला सांगितले तर, मी तुला बदनाम करून टाकेल असे धमकावले. यानंतर देखील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या दिवशी गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेविकेस नोटीस बजावली.

याबाबत त्यांना जाब विचारण्यासाठी ग्रामसेविका त्यांच्या दालनात गेली असता त्यांनी सांगितले की अजूनही वेळ गेलेली नाही. सर्व व्यवस्थित करून देईल, असे सांगितले. या गोष्टीच्या नैराश्यातून व बीडीओच्या छळाला कंटाळून ग्रामसेविकेने जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्याने त्यांची तब्येत खराब झाली होती, असेही फिर्यादीत म्हटले आहे. तसेच एक गिष्ट दयावे लागेल असा आश्लिल मॅसेज पिडीतेच्या मोबाईलवर पाठवित व व्हॉट्सॲपद्वारे अश्लील मॅसेज चॅटींग करुन मानसिक स्थिती खराब केली. तसेच अडचणीचे ठिकाणी बदली करुन टाकील अशी धमकी दिली. याप्रकरणी दि. ८ रोजी पारोळा पोलीस स्टेशनला गटविकास अधिकाऱ्याविरुद्ध भादवि कलम ३५४, अ, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे हे करीत आहे.

