जळगाव: पोलीस वृत्त- ऑनलाईन: शहरातील माहेरून १५ लाख रुपये आणावे लागतील नाहीतर तुला नांदवणार नाही असे सांगून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जळगाव येथील वाघ नगरातील संस्कार कॉलनीत माहेर असलेल्या समीक्षा योगेश देशमुख वय 27 लग्न झाल्यानंतर माहेरहून 15 लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा
15 जुलै 2021 ते 8 जुलै 2023 पर्यंत शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार समीक्षा देशमुख यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनला दिली. पती योगेश सतीश देशमुख(yogesh satisha deshamukh), सासरे लतिष देशमुख,(lalit Deshamukh) सासू सीमा लतीश देशमुख, आणि ननंद ज्ञानदा देशमुख सर्व राहणार मोरोपंत जोशी कॉलनी अमरावती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना प्रशांत पाठक करीत आहे.


