मुंबई : राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना पद आणि गोपीनयतेची शपथ घेतली. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार झाले आहे. राज्यात राष्ट्रवादी, शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर महायुती प्रबळ झाली आहे. छगन भुजबळ ,दिलीप वळसे पाटील आणि अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्री पदाची शपथ घेतली असून जिल्ह्यात तीन मंत्रीपदे आहेत . भाजपचे गिरीश महाजन , शिवसेनेचे गुलाबराव पाटील आणि आता राष्ट्रवादीकडून अनिल पाटील अशा रूपाने तीन मंत्रीपदे मिळाली असल्याने खान्देशच्या विकासात आणखी भर पडणार आहे.