अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाइन- राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून आमदारांना फोडून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अमळनेरला प्रथमच राज्यमंत्रीपद मिळाले. त्याबद्दल समाधानी आहे. पण सर्वसामान्यांचे राजकारणावरचा विश्वास उडावा अशी घटना या पंचवार्षिक कार्यकाळात दोनदा घडणे ही लोकशाहीची थट्टा आहे. यात भलेही सामान्य जनतेच्या विकासाचा मुद्दा असेल पण त्यामुळे जनमानसात लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन झाली आहे. डी ए धनगर यांनी पोलीस वृत्त शी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.