अमळनेर : पोलीस वृत्त ऑनलाईन– तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे कलाली येथे १७ वर्षीय तरुणीने सोमवारी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली.
कलाली येथील ज्ञानेश्वर सुकदेव कोळी यांची मुलगी लक्ष्मी कोळी ही दहावीची परीक्षा पास झाली होती. आज राहत्या घरी तिने गळफास घेतला.
नातेवाइकांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास हवालदार संजय पाटील करीत आहेत.


