अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन- प्रत्येक आस्थापनात अनेक अधिकारी येतात व बदली होऊन दुसऱ्या कडे जातात सुद्धा. परंतु काही अधिकारी असे असतात की, ते समाजाच्या उत्थानासाठी, लोकांच्या भल्यासाठी आपल्या कार्यकक्षेच्या परिघाबाहेर जाऊन कार्य करतात असे अधिकारी लोकांच्या दीर्घकाळ लक्षात राहतात.
अमळनेर पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी सुद्धा आपली जबाबदारी सांभाळत, कार्य कक्षेच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांसाठी व सिंचन क्षमता वाढीसाठी आपण अत्यंत सजग असल्याची जाणीव करून दिली त्याबद्दल डीवायएसपी सुनील नंदवाळकर साहेब यांचा सत्कार आर्मी स्कूलचे शिक्षक विजय बोरसे व साने गुरुजी विद्यालयाचे शिक्षक डी ए धनगर यांनी नुकताच केला.
जेव्हा एखादे अधिकारी जबाबदारीने एखादी गोष्ट सांगतात त्यावेळी समाजातील लोक /नागरिक निश्चित पणाने ऐकतात. साहेबांचा शब्द अंतिम माणूस ध्येयपूर्ती कडे वाटचाल करत असतात. हे सर्व करत असताना समाजातील कष्टकरी, वंचित, शेतकरी, दुर्बल घटकांना खूप मोठा फायदा होतो. असाच लोकांसाठी फायद्याचा उपक्रम डीवायएसपी सुनील नंदवाळकर साहेब राबवत आहेत. यापूर्वी काही साहेबांनी वेगवेगळ्या स्वरूपात लोक कल्याणकारी उपक्रम राबवले आहेत. असे साहेब अमळनेर करांच्या स्मरणात आजही आहेत. किंबहुना त्यांनी केलेली काम त्यांची आठवण करून देत आहेत. तसेच पद्धतीने अत्यंत शास्त्रीय पद्धतीने सिंचनाचे फायदे कसे होऊ शकतात? नंदवाळकर साहेब पटवून देत आहेत. शास्त्रीय पद्धतीने पाणी साठवण केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यांची अधिकची जमीन ओलिताखाली येईल, पर्यायाने सिंचन क्षमता वाढेल व कमी पावसात देखील चांगले पीक येऊ शकेल अशा या शुद्ध हेतूने नंदवाडकर साहेब कार्य करीत आहेत . त्यांचे या कार्याबद्दल त्यांचा सत्कार शिक्षकांनी केला. तसेच त्यांच्या चांगल्या कार्याची सर्वत्र कौतुक होत आहे.


