जळगाव पोलीस वृत्त ऑनलाईन: अमित राजसाहेब ठाकरे यांचा खान्देश दौरा दि.१८/७/२०२३ ते २३/७/२०२३ होणार असून दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी जळगांव जिलाध्यक्ष मुकुंद भाऊ रोटे यानी अमळनेर विधानसभा ची बैठक घेतली दरम्यान मा.राज ठाकरे यांचा जळगाव दौरा २०१३ मध्ये झाला होता.सागर पार्क येथील ऐतिहासिक सभा त्या वेळी झाली होती.त्या नंतर तब्बल दहा वर्षांनी मा.अमित साहेब ठाकरे जळगांव जिल्हा दौऱ्यावर येत आहे
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने ची नव्याने बांधणी,नवीन विद्यार्थी यांचे प्रवेश, मनाविसेचे जुने,नवे पदाधिकारी यांच्या सोबत संवाद व मनसे च्या सर्व आजी माजी पदाधिकारी ,सर्व अंगीकृत संघटना यांच्या सोबत चर्चा असे दौऱ्याचे स्वरूप असणार आहे.
तयारी-आढावा..
मा.अमित साहेब ठाकरे यांचा दौरा जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असून त्या अनुषंगाने जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष यानी अमळनेर येथे विधानसभा निहाय बैठक घेतली बैठकीला उपस्थित जिल्हाध्यक्ष मुकुंद भाऊ रोटे, जिल्हा उपाध्यक्ष कृषी भूषण सतीश निंबा काटे, तालुका अध्यक्ष संदीप पाटील, शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, राकेश दाभाडे, शहर उपाध्यक्ष करण पाटील, शहर उपाध्यक्ष जय राजपूत, शहर सचिव निलेश भावसार, गन अध्यक्ष भगवान पाटील गणाध्यक्ष अतुल कोळी विभाग अध्यक्ष बापू चौधरी पैलाड वार्ड अध्यक्ष गजानन गोसावी मनसे सैनिक योगेश पाटील राजू सोनवणे तुषार भावसार संकेत पाटील गणेश धाकुर प्रवीण कोळी रावसाहेब पारधी उपस्थित होते



