धरणगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन– तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. बांभोरी येथे एका २४ वर्षीय तरुणाच्या खुनाने एकच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरानजीक असलेल्या बांभोरी गावातील गिरणा नदी पात्रात एका २४ वर्षीय आशिष या तरुणाचा खून झाल्याची घटना दिनांक २३ रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्यासह धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी दाखल झाले होते.


