आजपासून देशातील अनेक राज्यांत पाऊस सक्रिय होणार आहे. तसेच येत्या काही दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच आज कोकणातील काही भागासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे.
तसेच 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. याच काळात तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता :* महाराष्ट्राव्यतिरिक्त उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगण या राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
एकंदरीत, आजपासून पावसाची रिमझिम सुरु होणार असून 26 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


