चोपडा: पोलीस वृत्त- शहरात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर रात्रीच्या सुमारास वाढदिवसाचा केक मोटरसायकलीच्या सीटवर ठेवून तलवारीने कापल्या प्रकरणी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान वाढदिवसाचा केक सार्वजनिक ठिकाणी रोडवर कापण्यासाठी लोखंडी धारदार तलवारीचा वापर करण्यात आला. यासंदर्भात गोपनीय माहितीच्या आधारावर व मिळालेल्या फोटोवरून आठ जणांची ओळख पटविण्यात आली. यातील सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक जण अद्याप मिळून आला नाहीये. चोपडा शहर पोलीस स्टेशन मार्फत कारवाई करण्यात आली असून अधिक तपास करण्यात येत आहे.


