जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये भूकंप झाला आहे. गेल्या 24 तासांत एक नव्हे तर तब्बल पाच वेळा भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती समोर आली आहे.

या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केलवर इतकी होती. जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी, 17 जून रोजी दुपारी 2:30 वाजता पहिला भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल होती.लेहमध्ये भूकंपाचा दुसरा हादरा जाणवला. हा भूकंप शनिवारी रात्री 9.44 वाजता झाला असून त्याची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल होती.
तिसरा भूकंपाचा धक्का जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे भारत-चीन सीमेजवळ रात्री 9.55 वाजता झाला, या भूकंपाची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल इतकी होती.एकंदरीत, या भूकंपामुळे अद्याप कोणतीही हानी झाली नाही. तसेच गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारत, चीन, पाकिस्तान, अगाणिस्तान या भागांत सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

