जळगाव: पोलीस वृत्त- ऑनलाईन– जिल्ह्यात गुटखा माफिया सक्रिय असून, ते बिनधास्तपणे गुटखा विक्री करतात. शहरातील प्रत्येक रस्त्यावर आणि चौकातील टपरीवर गुटखा खुलेपणाने विक्री केला जातो. जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यापासून अवैधरित्या होणारी गुटख्याची वाहतूक सर्रास सुरू आहे. पोलिसांचे यावर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. चाळीसगाव जवळ पोलिसांनी अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर जप्त केले. यात १८ लाखाचा गुटखा जप्त केले आहे.
चाळीसगाव तालुक्यात अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणारा बोलेरोवर पोलिसांनी खरजई रोडवरील रेल्वे गेटजवळ 14 जून रोजी ताब्यात घेत 18 लाख 32 हजार 904 रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शुक्रवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय
गुलाब कोतकर (24 गुरुवर्य नगर, हिरापूर रोड,चाळीसगाव) या संशयितावर गुन्हा दाखल झाला आहे.


