शिरोळ- टाकळी ( पोलीस वृत्त- ऑनलाईन)’माय ही माय’ असते ती दुधावरची साय असते असे म्हटले जाते जगात आईला खूप महत्त्वाचे स्थान आहे तुझ्या आईच्या मृत्यूची बातमी ऐकताच मुलानेही पाठोपाठ जीव आहे. कृष्णा नदीत पूजनासाठी गेलेल्या आईचा बुडून मृत्यू झाल्याची बातमी ऐकताच मुलाने जीव सोडला. ही घटना शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी या गावामध्ये घडली.

गोपाळ खंडू पाटील (रा. सैनिक टाकळी, ता. शिरोळ) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
गोपाळ पाटील यांच्या आई बाबाई खंडू पाटील या कृष्णा नदीपात्रात धार्मिक विधी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आंघोळ करताना त्यांचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान, गोपाळ पाटील यांना डेंग्यूसदृश आजार झाला होता. यामुळे त्यांच्यावर सांगलीमधील एका दवाखान्यात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांना आईच्या निधनाची बातमी समजली. त्या धक्क्याने त्यांचाही मृत्यू झाला.

