तुम्हाला माहिती असेल रेल्वेत विनातिकीट प्रवास करणे दंडात्मक गुन्हा आहे. असं करताना तुम्ही आढळल्यात तुम्हाला दंड भरावा लागेलत, याशिवाय तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. त्यासाठी आता रेल्वेने नवीन सुविधा आणली आहे.
पहा कशी आहे सुविधा
जर तुम्ही घाईघाईत ट्रेनचं तिकीट खरेदी करु शकत नसाल तर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट काढून प्रवास करु शकता. त्यानंतर ट्रेनमध्ये चढून तुम्हाला सर्वात आधी प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन टीसीकडे जावं लागेल.
तसेच तुम्हाला कुठपर्यंत प्रवास करायचा आहेत याबाबची माहिती टीसीला द्यावी लागेल. त्यानंतर टीसी तुम्हाला तुमच्या प्रवासाचं तिकीट तयार करुन देईल. जर ट्रेनमध्ये सीट रिकामी असेल तर तुम्ही त्या सीटवर बसू पण शकता.


