भंडारा: पोलीस वृत्त ऑनलाईन– सासरा व सुनेतील भांडणात सासऱ्याने रागाच्या भरात सुनेच्या मानेवर कुऱ्हाडीचे वार घालून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रोहना येथे शुक्रवारी घडली.
पिंकी सतीश ईश्वरकर (२५) असे मृत पावलेल्या सुनेचे नाव आहे. ही घटना मोहाडी तालुक्यातील रोहणा येथे शुक्रवारी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घडली. बळवंत रघुजी ईश्वरकर (५५, रोहणा) असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे. मृत पिंकीला तीन वर्षाचा एक मुलगा असून आईच्या प्रेमाला मुकला आहे.(Deceased Pinky has a three-year-old son and misses his mother’s love.)

काही दिवसांपासून सासरा व सुनेत नेहमी भांडण होत असल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. शुक्रवारी सकाळी पिंकी भांडी घासत असताना सासरा बळवंत याने मागेहून येऊन पिंकीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केला. तशीच ती रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली. यावेळी तिचा पती व मुलगा किराणा दुकानात गेले होते.
बळवंत ईश्वरकरला अटक करण्यात आली आहे. भांडण कशावरून सुरू होते, सुनेची हत्या करण्यापर्यंत बळवंतने निर्णय का घेतला, हत्येचे नेमके कारण काय, या दिशेने मोहाडी पोलिस तपास करीत आहेत.
सुनेवर कुऱ्हाडीचे घाव घातल्यानंतर आरोपी बळवंत हा स्वत: च मोहाडी पोलिस ठाण्यात गेला. तसेच त्याने सुनेची हत्या केल्याची माहिती दिली. याचवेळी त्याला ताब्यात घेत पोलिसांनी घटनास्थळ

