अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन- ग्रामपंचायत मधिल दिव्यांगांवर दरवर्षी ५% निधी खर्च करणे शासनाकडून बंधनकारक आहे. त्याबाबत नियम देखील असतांना, श्री.संजीव साहेबराव सैंदाणे तत्का.ग्रामसेवक ग्रा.प.दहिवद ता.अमळनेर यांनी दिव्यांग ५% निधीतून ३०% दिव्यांगत्व असलेल्या शासकीय कर्मचारी यांना एकठोक निधीत लाभ देऊन दिव्यांग निधी वाटपात घोळ केला होता. सदर प्रकरण प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार यांनी माहितीचा अधिकारातून उघडकीस आणले होते. मा.आ.बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाने, अभय पवार सर (पुणे) व adv. कविताताई पवार, दिलीप दिघे, adv. लक्ष्मण पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश पवार यांनी मु.का.अ. जि. प.जळगांव (डॉ.पंकज आशिया) यांच्या कडे तक्रार केली असता, सदर प्रकरण हे १८ महिने न्यायप्रविष्ट होते. परंतु दि.२६/०४/२०२३ रोजी नियुक्ती प्राधिकरण यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा ( शिस्त व अपील ) नियम १९६४ मधील ४(१) नुसार ठपका ठेवल्याचे आदेश देऊन, सदर आदेशाची नोंद श्री.संजीव साहेबराव सैंदाणे ग्राविअ यांच्या मुळ सेवापुस्तकात घेणे बाबत गटविकास अधिकारी यांना आदेश करण्यात आले आहेत. सदर प्रकरणी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याने, तालुकाध्यक्ष योगेश पवार , उपाध्यक्ष प्रदिप सोनवणे, शहराध्यक्ष नूरखान पठाण, जि. उपाध्यक्ष जितेंद्र पाटील पारोळा, योगेश चौधरी (एरंडोल) हेमंत महाजन पारोळा, योगेश पाटील मारवड, संगिता पाटील परधाडे, मधुकर पाटील (टेलर), भाऊसाहेब पाटील व इतर सहकाऱ्यांनी पाठपुरावाअंती प्रहार अपंग क्रांती संघटनेला यश प्राप्त झाले असून, महाराष्ट्रातील पहिल्या ग्रामविकास अधिकारी यांच्यावर दिव्यांग निधीत घोळ केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाईने केली असल्याची माहिती योगेश पवार यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.